Posts

Showing posts from May, 2024
Image
  Prasad Vaidya ||काही तरी सार्थकता घडावी या नश्वर देहाची|| Saturday 11 May 2024 चोपडा   चोपडा  सातपुड्याच्या कुशीत पहुडलेले, ऐतिहासिक, राजकीय, धार्मिक, शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतिक, इ. अशी बहु मुखी ओळख असलेले अंकलेश्वर ते बुर्हाणपुर ह्या महामार्गावर व रत्नावती काठी वसलेले ते चोपडा.  एकेकाळी पाटील गढी, सुंदर गढी, मल्हार पुरा व मोठा देव्हारा अशा चार पाड्यात विभागलेले पण नंतर चार पाडे एकत्र येऊन चौपाडा व अपभ्रंश होऊन चोपडा म्हणून नावारूपाला आले. आज दुर्दैवाने या लेखातील काही गोष्टी अस्तित्वात नसतील ही. पण एके काळी चोपड्यचा इतिहास हा अति वैभवशाली नसला, तरी विविध परंपरांनी भरलेला होता.  चोपडा तालुका श्री रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेला व त्याची साक्ष म्हणजे चोपड्यापासून ९/१० कि. मी अंतरावर असलेले उनपदेव येथिल उष्ण पाण्याचे झरे. शरभंग ऋषींना रोगमुक्त करण्यासाठी प्रभु श्रीरामांनी आपल्या बाणांनी उष्ण पाण्याचे झरे निर्माण केले. अशी एक आख्यायिका आहे. अटलबिहारी वाजपेयी, बाळासाहेब ठाकरे, शत्रुघ्न सिन्हा, कांचीपुरमचे शंकराचार्य अशी नामवंत व्यक्तींच्या पदस्पर्शाने पाव...